Home अहमदनगर अहमदनगर: महिलेला बळजबरीने पळवून नेऊन अनैसर्गिक कृत्य केले

अहमदनगर: महिलेला बळजबरीने पळवून नेऊन अनैसर्गिक कृत्य केले

Breaking News | Ahmednagar Crime: पतीपासून अलिप्त राहणाऱ्या महिलेला बळजबरीने पळवून नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना.

woman was forcibly abducted and subjected to unnatural acts

अहमदनगर: पतीपासून अलिप्त राहणाऱ्या महिलेला बळजबरीने पळवून नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवारी (दि. २४) दुपारी नगर शहरात घडली. शहरातील एका उपनगरात माहेरी राहणाऱ्या क पीडित महिलेने याप्रकरणी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात  तरुणाविरोधात अनैसर्गिक अत्याचार, विनयभंग, अपहरण, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल खान (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी यांची साहिल खान सोबत ओळख असल्याने ते मित्र म्हणून बोलत होते. दरम्यान फिर्यादी यांचा विवाह पुणे येथील एका मुलासोबत मे २०२० मध्ये झाला होता. त्यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी त्यांच्या पतीपासून अलिप्त राहत होत्या. त्यांनी पतीविरोधात येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी शनिवारी सकाळी तारखेसाठी भरोसा सेलमध्ये आल्या होत्या. त्यावेळी साहिल तेथे आला होता. दुपारी एक वाजता फिर्यादीचे भरोसा सेलमधील काम संपल्यानंतर त्या मैत्रिणीसोबत तिच्या घरी रिक्षातून जाण्यासाठी निघाल्या असता साहिल याने त्यांचा पाठलाग केला. तो पाठलाग करत असल्याने फिर्यादी व त्यांची मैत्रिण घरी न जाता मैत्रिणीच्या दिल्लीगेट येथील वसतिगृहात गेल्या. दरम्यान मैत्रिण वसतिगृहात गेल्यानंतर फिर्यादी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या असताना साहिल तेथे आला. त्याने फिर्यादीचा हात पकडून, ‘तु मेरी नहीं हुई तो किसी की नहीं होनी चाहीए, मैं तेरेको मार डालूंगा’, असे म्हणत त्याने फिर्यादीला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसून भूईकोट किल्ल्याच्या मैदानावर घेऊन गेला. तिने त्याने फिर्यादीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादीने विरोध केला असता त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याच्या तावडीतून फिर्यादीने सुटका करून घेत रिक्षाने घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून साहिल खान विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: woman was forcibly abducted and subjected to unnatural acts

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here