Home अहमदनगर अहमदनगर: ऊस ट्रॅक्टर पळविणारी टोळी जेरबंद

अहमदनगर: ऊस ट्रॅक्टर पळविणारी टोळी जेरबंद

Breaking News | Ahmednagar: दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना मारहाण करून त्यांच्याकडील ट्रॅक्टर चोरून नेल्याच्या घटना घडल्या.

Sugarcane tractor hijacking gang Arrested

श्रीरामपूर: गेल्या आठवड्यामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना मारहाण करून त्यांच्याकडील ट्रॅक्टर चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे.

दि. १९ फेब्रुवारी रोजी भेर्डापूर येथील किशोर दत्तात्रय धिरडे हे महांकाळवाडगाव येथून ट्रॉलीमध्ये ऊस भरून अशोकनगर येथे जात असताना खोकर फाटा येथे ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली रोडच्याकडेला उभी करून थांबलेले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या स्विफ्टमधून चार अनोळखींनी धिरडे यास हत्याराचा धाक दाखवून त्यांना स्विफ्ट कारमध्ये बसवून त्यांचा ट्रॅक्टर चोरुन घेऊन गेले, याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दुसन्या घटनेत दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री फिर्यादी अरुण सिताराम पवार (रा. निपाणी निमगाव, ता. नेवासा) हे भानसहिवरे शिवारातून त्यांचा ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्यांच्या ट्रॅक्टरला स्विफ्ट गाडी आडवी लावून फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर चोरून नेला होता, सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरील दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही सारखीच असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचा गुन्हाचा तपास लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सुचना केल्या, पोलीस पथकाने बरील दोन्ही गुन्हे घडले त्याठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती काढली. दि. २४ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदरचे गुन्हे हे अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख (रा. कोल्हार बद्रक) याने व त्याच्या इतर साथीदारांनी केले असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक आरोपीची माहिती काढत असताना सदर आरोपी हा त्याच्या राहत्या घराजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीच्या राहत्या घरासमोर एका स्विफ्ट कारजवळ दोन इसम व कारमध्ये काही इसम बसलेले दिसले. पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले,

ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख, शकिल नजीर शेख (बम २४), विशाल सुनील बर्डे, अक्षय श्रीराम जमधडे (बय २०, रा. अंबिकानगर, कोल्हार), सोहेल नसीर शेख (रा. पिंजारगल्ली बाजारतळ, कोल्हार), विवेक लक्ष्मण शिंदे (बय २६, रा. टाकळीभान) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी बरील दोन्ही गुन्हे फरार साथीदार राहूल आहेर (पूर्ण नांव माहित नाही, रा. भोकर) यांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून हत्यार एअर पिस्टल, लोखंडी कत्ती तसेच रोख रक्कम, स्विफ्ट कार, मोबाईल तसेच आरोपी अल्लाउद्दीन शेख याच्या घराच्या पाठीमागील काटवरातून दोन चोरीचे ट्रॅक्टर असा एकूण ११,३७,००० रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी ईकबाल उर्फ सोन सिकंदर शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द अहमदनगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खून, जबरी चोरी, घरफोडी, बिनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे, शसे बाळगणे अशा प्रकारचे एकुण १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेचे अल्लाउद्दीन इब्राहिम शेख याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी अशा प्रकारचे एकूण ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विवेक लक्ष्मण शिंदे याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्य दरोडा, घरफोडी, विनयभंग अशा प्रकारचे एकूण ३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Sugarcane tractor hijacking gang Arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here