Home संगमनेर संगमनेर: कुरण ग्रामपंचायतीला साडेदहा लाखांचा दंड

संगमनेर: कुरण ग्रामपंचायतीला साडेदहा लाखांचा दंड

Breaking News | Sangamner: गौण खनिजाचे उत्खनन करून तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतीने (मुरूम) अवैध प्रकारे विक्री केल्याचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्याने तहसीलदार धीरज मांढरे यांनी ग्रामपंचायतीला १० लाख ५८, ४०० रुपयांचा दंड.

fine of ten and a half lakhs to Kuran Gram Panchayat

संगमनेर: गौण खनिजाचे उत्खनन करून तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतीने (मुरूम) अवैध प्रकारे विक्री केल्याचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्याने तहसीलदार धीरज मांढरे यांनी ग्रामपंचायतीला १० लाख ५८, ४०० रुपयांचा दंड ठोठावला.

तालुक्यातील कुरणचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी संगणमताने गट नंबर २५७ मधून ८४ ब्रास अवैध उत्खनन करून विक्री केली. याबाबत तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली. याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार मांढरे यांनी दिले होते. तपासात गौण खनिज विक्री केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ (७) मधील तरतुदीनुसार गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक व रॉयल्टी असा एकूण १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ग्रामपंचायतला ठोठावण्यात आला.

कुरण ग्रामपंचायतीने मुरूम अवैधरित्या उत्खनन करून तो विकल्याचा अहवाल मंडळ अधिकारी (समनापूर) यांनी तहसील कार्यालयाला दिला होता. पंचनामा व अहवाल तहसील कार्यालयाचा प्राप्त झाल्यानंतर कुरण ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली. ग्रामपंचायतीने ही तक्रार राजकीय आकसापोटी केल्याचे म्हटले होते. ग्रामपंचायतने मुरूम किंवा गौण खनिजाचे उत्खनन केले नाही. यामुळे तक्रार पूर्णतः खोटी आहे. गट नंबर २५७ मधील ८४ ब्रासच्या उत्खननास केलेला खड्ड्याचा पंचनामा यापूर्वीचा आहे. त्याच्याशी ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही. पंचनामा तक्रारदाराच्या नातेवाईकांनी बनवून शासनाची दिशाभूल केली आहे, असे ग्रामपंचायतीने खुलाशात म्हटले होते.

Web Title: fine of ten and a half lakhs to Kuran Gram Panchayat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here