अहमदनगर: महिला नातेवाईकांची भांडण सोडवायला गेली अन घात झाला
Ahmednagar News: नातेवाईकांची भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या महिलेस लाकडी दांड्याने मारहाण केल्याने तिचा खून (Murder) झाल्याची घटना, सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल.
पाथर्डी: नातेवाईकांची भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या महिलेस लाकडी दांड्याने मारहाण करत तीचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.22) दुपारी पाथर्डी तालुक्यातील किर्तनवाडी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशाला राजेंद्र किर्तने (43, रा. किर्तनवाडी, ता. पाथर्डी) ही महिला मयत झाली आहे. तर शहादेव रामकिसन धायतडक, शुभम शहादेव धायतडक, रणजीत आजिनाथ धायतडक, अक्षय सखाराम धायतडक (रा. धायतडकवाडी, ता. पाथर्डी), संदीप बाळासाहेब शिरसाट (पिंपळगावटप्पा, ता. पाथर्डी), सोमनाथ गणपत घुले (शेकटे, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी बडेवाडी येथे दहाव्याच्या कार्यक्रमात शहादेव धायतडक व बाळासाहेब शिरसाट यांच्यात किरकोळ वाद झाला होता. बाळासाहेब शिरसाट हा सुशालाचा भाऊ आहे. तो बडेवाडी येथे वाद झाल्यानंतर किर्तनवाडी येथे आला.त्यानंतर सुशाला किर्तने यांचा मेहुणा शहादेव धायतडक, शुभम धायतडक व शुभमचे चार सहकारी असे सहाजण किर्तनवाडी येथे तीन मोटारसायकल वरुन आले. या पाहुण्यांमध्ये सुशाला राजेंद्र किर्तने यांच्या घरी पुन्हा वाद पेटला. यावेळी राजेंद्र किर्तने, सुशाला किर्तने व भागवत किर्तने वाद सोडविण्यासाठी मध्ये गेले. सुशाला हिच्या डोक्यात शुभम धायतडक याने दांडक्याने जोरात फटका मारला. यामुळे ती जमीनीवर पडली व बेशुद्ध झाली. तर धनाजी नामदेव किर्तने हे जखमी झाले आहेत.
यातील चौघेजण पळुन गेले. त्यानंतर शहादेव व शुभम धायतडक यांना ग्रामस्थांनी पकडुन ठेवले. सुशाला हिस उपचारासाठी खरवंडी व त्यानंतर पाथर्डी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पाथर्डी पोलिसांनी खुनाचा संशयित सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायय्क पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य रामनिरंजन वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास कौश्यल वाघ करीत आहेत.
Web Title: woman who went in to settle a dispute between her relatives was beaten to Murder
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App