Home अहमदनगर मोबाइलवरच ई- रेशन (शिधापत्रिका) कार्ड, ऑनलाइन करा अर्ज : डाउनलोड करून प्रिंटही...

मोबाइलवरच ई- रेशन (शिधापत्रिका) कार्ड, ऑनलाइन करा अर्ज : डाउनलोड करून प्रिंटही काढता येणार

E-Ration card:  प्रिंटेड रेशन कार्ड न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याऐवजी आता ई-रेशन कार्ड (शिधापत्रिका) देण्यात येणार.

E Ration card on mobile, apply online Download and print can also be done

अहमदनगर: सध्या अस्तित्वात असलेले प्रिंटेड रेशन कार्ड न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याऐवजी आता ई-रेशन कार्ड (शिधापत्रिका) देण्यात येणार आहे. हे ई- रेशन कार्ड लाभार्थ्यांना मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकावरून डाउनलोड करून सेव्ह करता येणार आहे. तसेच त्याची प्रिंटही काढता येणार आहे.

लाभार्थ्यांना रेशन दिल्यानंतर पूर्वी रेशन कार्डवर नोंद केली जात होती. मात्र, आता डिजिटायझेशन झाल्यानंतर रेशन कार्डवरच्या नोंदी बंद झाल्या आहेत. आता रेशन घ्यायला गेल्यानंतर पॉस मशीनवर अंगठा देऊन धान्य मिळते. याची ऑनलाइन नोंद होते. त्यामुळे रेशन कार्डवर नोंद करण्याची पद्धत आता पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे पूर्वीचे रेशन कार्ड सध्या डिजिटायझेशनच्या जमान्यात बाद ठरले आहे. त्यामुळे आता ज्या लोकांना नव्याने रेशन कार्ड काढायचे आहे, त्यांना ऑनलाइन अर्ज करून ई-शिधापत्रिका दिली जाणार आहे.

ई-शिधापत्रिकेवर अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, राज्य योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतव्यतिरिक्त असे नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ई-शिधापत्रिकेसाठी सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व राज्य योजनेचे

शिधापत्रिकाधारक गरीब व गरजू कुटुंबातील असल्याने या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मोफत ई-शिधापत्रिका देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत १६ मे रोजी आदेश काढण्यात आला आहे.

आता रंगहीन शिधापत्रिका: सध्याचे रेशन कार्ड अंत्योदय, प्राधान्य कुटुंब अशा योजनांनुसार केशरी अथवा पिवळ्या ‘रंगाचे असते. मात्र, आता ई- शिधापत्रिकेवर केशरी, पिवळा रंग बाद होऊन त्याऐवजी अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना अथवा राज्य योजनेतील असे कोणत्या योजनेअंतर्गत हे रेशन कार्ड देण्यात आले आहे, याचा उल्लेख असणार आहे. त्यामुळे ई-शिधापत्रिका रंगहीन असणार आहे.

ई-शिधापत्रिका लाभार्थ्यांना आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉप किंवा संगणकावर rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. तसेच यापुढे आता नव्याने रेशन कार्ड देण्यात येणार नसून, आता ई- शिधापत्रिकाच दिल्या जाणार आहेत.

आता रेशन कार्डवर रेशन दिल्याच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत. आता फक्त रेशन कार्डवरील क्रमांक जरी सांगितला तरी धान्य मिळते. त्यामुळे नव्याने रेशन कार्ड घेताना लाभार्थ्यांनी ई-रेशन कार्ड घ्यावे. हे ई-रेशनकार्ड आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करता येऊ शकते. तसेच पाहिजे तेव्हा प्रिंटही काढता येऊ शकते. त्यामुळे या सेवेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

Web Title: E-Ration card on mobile, apply online: Download and print can also be done

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here