Home अहमदनगर अहमदनगर: नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले

अहमदनगर: नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले

Ahmednagar News:  नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून (abducted) नेण्याचा प्रकार घडला. मोलमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांना तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद.

minor girl studying in ninth standard was abducted

श्रीरामपूर | Shrirampur : पढेगाव परिसरात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना १९ मे रोजी घडली. मुलीचे वडील मजुरी काम करतात. त्यांनी मुलीच्या बेपत्ता प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे, १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे रोजी रात्री ८ वाजता बेपत्ता झाली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला; परंतु तिचा तपास लागला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथून नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला. मोलमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांना तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलीचे वय १५ वर्षे आहे. शनिवारी रात्री आठ वाजता घरात स्वयंपाक सुरू होता. त्यानंतर जेवणासाठी घरातील एका खोलीमध्ये बसलेल्या मुलीला बोलवण्यासाठी गेले असता, ती तेथे नव्हती. घराच्या परिसरात तिचा शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली. अखेर मुलगी कोठेही आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

चौकात एकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या (Suicide)

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील अडवाणी चौकात एकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली.

शुद्धोधन देवधर वानखेडे (५५, रा. गजानन कॉलनी, साईराजनगर, नागापूर) असे गळफास लावून घेतलेल्या इसमाचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: minor girl studying in ninth standard was abducted

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here