Home संगमनेर संगमनेर: मोबाईल टॉवरवरुन पडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: मोबाईल टॉवरवरुन पडून तरुणाचा मृत्यू

Sangamner News:  मोबाईल टॉवरवरील बसलेल्या पक्षांना पकडण्याच्या नादात टावर वरून पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना.

young man death after falling from a mobile tower

संगमनेर: मोबाईल टॉवरवरील बसलेल्या पक्षांना पकडण्याच्या नादात एका युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना संगमनेर  तालुक्यातील अंभोरे  शिवारात घडली.

गणेश भास्कर गवळी (वय 27) असे मयत तरुणाचे नाव आहे. गवळी हा आपला मेव्हणा काळू बर्डे याच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याचे समजते. रात्री गावात मोबाईल टॉवरवर  अनेक पक्षी बसलेले पाहून त्यांना पकडण्याच्या नादात गणेश गवळी हा टॉवरवर चढला.

मात्र त्याचा तोल जावून तो खाली पडला. मात्र टॉवरच्या एका लोखंडी अँगलला तो अडकला. सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील विनोद साळवे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. गणेश गवळी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

पोलीस पाटील साळवे यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 63/2023 नुसार नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सय्यद करत आहे.

Web Title: young man death after falling from a mobile tower

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here