Home क्राईम इगतपुरी हादरलं! कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार, नंतर संपवलं

इगतपुरी हादरलं! कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार, नंतर संपवलं

Nashik Crime:  कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेतेचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली, महिलेवर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

married woman who went to wash clothes was abused, then Murder

नाशिक:  इगतपुरी  तालुक्यातील खंबाळे गावात महिलेसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या  विवाहिततेचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिलेवर हत्येपूर्वी अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील ही संताप आणणारी घटना घडली आहे. खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीच्या पाण्यात सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास 40 वर्षीय महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी या महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. बराचवेळ झाला तरी मुक्ताबाई अजुन घरी का परतली नाही, हे पाहण्यासाठी कुटुंबातील सदस्य खदाणी जवळ गेले असता ही घटना उघडकीस आली. कुटुंबातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरीक घटनास्थळी दाखल झाले.

रविवार सकाळी नऊ वाजेच्या सुमारास खंबाळे गावातील 40 वर्षीय विवाहिता कपड़े धुण्यासाठी विश्रामगृहालगत खाणी जवळ जात असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समजते. संशयिताने तिच्या डोक्यात दगडाने प्रहार करून तिला जीवे मारले. नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी एका संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेत तिघांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, दोघे फरार आहेत. संतप्त नागरिकांसह मृताच्या नातलगाच्या आक्रोशाला पोलिसांना सामोरे जावे लागले. दरम्यान या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे घोटी पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत होते. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. घटनेनंतर खंबाळे, घोटी परिसरातील नागरिकांसह मृत महिलेच्या नातलगांनी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आक्रोश केला. संशयितांना ताब्यात द्या, सर्व संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली.

Web Title: married woman who went to wash clothes was abused, then Murder

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here