भर चौकात हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर झाडल्या गोळ्या, खून करून आरोपी पसार
Pimpri Crime: चिखली परिसरात दिवसाढवळ्या भर चौकात तरुणावर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली असून यामध्ये संबधित तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना.
पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात दिवसाढवळ्या भर चौकात तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यामध्ये संबधित तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोन्या तापकीर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची हत्या का झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत अधिक तपास सुरू केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगपालिका हद्दीतील चिखली हे मोठे गाव. या गावच्या कमानी शेजारी बस स्टॉप आहे. या ठिकाणी दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी सोन्या तापकीर नावाच्या तरुणावर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात सोन्या हा गंभीर जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Shots firing at youth in broad daylight, Accused escapes after murder
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App