Home क्राईम धक्कादायक! सेक्स रॅकेटसाठी जन्मदात्या आईनेच केला दोन मुलींचा सौदा

धक्कादायक! सेक्स रॅकेटसाठी जन्मदात्या आईनेच केला दोन मुलींचा सौदा

Nagpur Crime:  सेक्स रॅकेटसाठी आईनेच मुलींचा सौदा केल्याची घटना समोर आली, वेश्याव्यवसायासाठी जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलींचा सौदा केल्याचा प्रकार समोर. वेश्याव्यवसायासाठी महिलेने आपल्या मुलींना विकल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

mother made the deal of the two daughters for the sex racket

नागपूर: वेश्याव्यवसायासाठी जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलींचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील पंचशिलनगर येथे ही घटना घडली असून त्यानंतर आता पाचपावली पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोनी विजय असं आरोपीचं नाव असून तो खरेदी केलेल्या मुलींना देहव्यापारासाठी गोव्यात नेणार होता, त्यापूर्वीच पोलिसांनी प्रकरणाचा भांडाफोड करत आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी शहरातील एका हॉटेलमधील वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला होता, त्यानंतर आता सेक्स रॅकेटसाठी आईनेच मुलींचा सौदा केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  आरोपी विजय टोनी हा नागपुरातील एका बारमध्ये काम होता, त्यावेळी त्याची ओळख एका महिलेशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, त्यानंतर महिलेची मैत्रिणीशी विजयने मैत्री केली. त्यानंतर आरोपी निकिता हीने विजयला तिच्या दोन मुली वेश्याव्यवसायासाठी विकल्या. झटपट पैसा कमविण्यासाठी आरोपी निकिताने आपल्या मुलींचा सौदा करत विजयकडे सोपवल्या. त्यानंतर विजयने दोन्ही मुलींना वेश्याव्यवसायासाठी गोव्यात नेण्याचा प्लॅन आखला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून विजय टोनी आणि निकिता यांच्या घरावर छापा मारत दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं आहे.

आरोपी निकिता या महिलेच्या दोन्ही मुली देहव्यापार करण्यासाठी नकार देत होत्या. परंतु विजय आणि आई निकिता मुलींवर दबाव टाकत होते. काही दिवसांपूर्वी दोघांनी अल्पवयीन मुलींना यवतमाळ येथील ग्राहकांच्या घरी पाठवलं होतं, असं तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली असून महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी शहरातील एका हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर आता वेश्याव्यवसायासाठी महिलेने आपल्या मुलींना विकल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: mother made the deal of the two daughters for the sex racket

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here