Home अकोले निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Cm Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जलसंपदा विभागाला निर्देश.

work of Nilwande Canal by the end of December CM Eknath Shinde

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के, तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या दोन्ही कालव्यांचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. या योजनेमुळे ८३ गावांतील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार आहे.

गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याबाबतही सर्व्हे

■ अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोयात वळविण्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

■ डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनीबाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: work of Nilwande Canal by the end of December CM Eknath Shinde

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here