Home क्राईम मित्राच्या पत्नीचे अपहरण करून जंगलात नेऊन अत्याचार, त्यानंतर घडले असे भयंकर

मित्राच्या पत्नीचे अपहरण करून जंगलात नेऊन अत्याचार, त्यानंतर घडले असे भयंकर

Sexual abuse:  पतीच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून ही घटना केल्याची माहिती समोर आली.

friend's wife was kidnapped and taken to the forest and abuse

नागपूर:  मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर  अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेनं आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी  एकावर गुन्हा दाखल केला आहे. पतीच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून ही घटना केल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील मौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा नागपुरातील मेडिकल रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. पतीचा आणि मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन संशियत आरोपीने मित्राच्या पत्नीचे अपहरण केले. तिला जंगलात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करुन पुन्हा घरी नेऊन सोडले.

या धक्याने घाबरलेल्या पीडित महिलेने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सतीश जौंजाळकर याच्यावर गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

याबाबत हेमंतकुमार खराबे (पोलीस निरीक्षक. मौदा पोलीस स्टेशन) म्हणाले, संशयित आरोपी सतीश हा चालक आहे. तो पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. पीडित महिलेने या प्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात सतीश याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

Web Title: friend’s wife was kidnapped and taken to the forest and abuse

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here