Home भंडारा पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून, पतीचीही आत्महत्या

पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून, पतीचीही आत्महत्या

आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून (Murder) करून पतीनेही स्वतःचा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Murder Wife's throat was cut with a blade, husband's suicide

तुमसर (जि. भंडारा): आर्थिक तंगीतून पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून पतीनेही स्वतःचा ब्लेडने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

सरिता सुरेश बोरकर (३७) असे पत्नीचे, तर सुशील नीलकंठ बोरकर (४५) असे मृत पतीचे नाव आहे. दोघेही गोबरवाही रोडवरील सीतासावंगी येथे राहायचे. सुशीलचा अंडीविक्रीचा व्यवसाय आहे. सरिता आशासेविका म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होती. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्री सुशील, सरिता व त्यांची दोन्ही मुले झोपी गेली. मुले एका खोलीत तर पती-पत्नी दुसऱ्या खोलीत होते. शुक्रवारी सकाळी बघितले असता पती- पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सरिता बिछान्यावर तर सुशील खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला.

या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. आतून दार बंद असल्याने बाहेरून कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती. तसेच खोलीत एक ब्लेड आढळून आले. त्यामुळे पत्नीचा ब्लेडने गळा चिरून खून करून सुशीलनेही त्याच ब्लेडने आपला गळा चिरून आत्महत्या केल्याचा संशय आहे.

Web Title: Murder Wife’s throat was cut with a blade, husband’s suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here