Home अहिल्यानगर होणाऱ्या पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

होणाऱ्या पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

young man for inciting his future wife to commit suicide

राहुरी | Suicide: होणाऱ्या पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गणेगाव येथील तरुणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देवळाली प्रवरा येथील मयत मुलीची आई रोहिणी राजेंद्र देठे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की,  माझी मुलगी शितल राजेंद्र देठे हिचे गणेगाव येथील सुयोग सुभाष कोबरणे याच्याशी दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी मुलगा, मुलाचे वडील, भाऊ, मेव्हणे, मामा यांनी माझी मुलीची पसंती करून लग्न जमविले होते. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम दि.15 जुलै 2021 रोजी ठरला होता. सुयोग कोबरणे व मुलगी शितल हे लग्न ठरल्यापासून नेहमी फोनवर बोलत असे. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करायचे. दि.12 जुलै 2021 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेच्या दरम्यान मुलगी शितल हिचे मोबाईलवर होणारा जावई सुयोग कोबरणे यांचे फोनवर संभाषण झाले होते. त्यावेळी मुलगी नाराज दिसली म्हणून मी तिला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा तिने सांगितले, सुयोग याने माझ्याशी लग्नास नकार दिला असून तू दुसरा मुलगा पहा, मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही, असे तो म्हणाल्याचे शितलने सांगितले. त्यावेळी मी मुलीस समजावून सांगितले.

त्यानंतर रात्री सुयोग कोबरणे यांचा माझे पती राजेंद्र यांना फोन आला, शितल ही माझा फोन उचलत नाही. तुम्ही घराबाहेर जाऊन पहा. असे सांगितले. बाहेर बघितले असता शितल हिने गायीच्या गोठ्यात लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसली. त्यावेळी ती बेशुध्द अवस्थेत होती. लगेच तिला खासगी वाहनाने राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथे विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे शितल हिस मोठ्या दवाखान्यात नेण्याचे सांगितल्याने प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी ती उपचारपूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सुयोग कोबरणे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: young man for inciting his future wife to commit suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here