Home अहमदनगर तरुणीने रुग्णालयातच घेतला गळफास

तरुणीने रुग्णालयातच घेतला गळफास

young woman was Suicide in the hospital

राहुरी | Suicide: देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय तरुणीने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्यावर राहुरी कारखाना येथे उपचार सुरु होते. तिने उपचार सुरु असताना रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.

देवळाली प्रवरा शहरातील अमरधाम येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पायल सुभाष मुसमाडे वय १७ रा, देवळाली प्रवरा या तरुणीने पाच दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिने औषध घेतल्याचे घरच्यांना लक्षात येताच राहुरी कारखाना येथील स्वामी विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरु होते, पण तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  

Web Title: young woman was Suicide in the hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here