Home अहमदनगर मोटारसायकल अपघातात नदीत पडून दोघांचा मृत्यू

मोटारसायकल अपघातात नदीत पडून दोघांचा मृत्यू

Ahmednagar Motorcycle Degradation river two Death

अहमदनगर | Ahmednagar: मोहटादेवीच्या दर्शनासाठी मोटारसायकलवर गेलेले तिघे जण परतत असताना आय टी आय इमारतीजवळ मोहटादेवी पाथर्डी रस्त्यावर पुलाचे काम चालू असल्याने हे तिघे जण पडले.

त्यातील राजेंद्र राख रा. शेवगाव या जखमी झाला असून त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

आनंद संजय जगधने व दीपक रामभाऊ धोत्रे दोघे रा. शेवगाव असे मृत व्यक्तींचे नावे आहेत. त्यांचे मृतदेह शवविचेदन करून नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे,

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोटारसायकल वर तिघे जण होते, एक जन जखमी झाला असून दोन जण बेपात्ता आहेत. पोलिसांनी शेजारील नदीत तपास केला असता दोघांचे मृतदेह पाण्यात सापडले.

अपघाताच्या ठिकाणी मोटारसायकल मिळाली आहे. तेथे रस्ता हा खड्यांचा आहे. रास्याचे काम सुरु आहे. ठेकेदाराने कोणतेही फलक लावलेले नाही.

या अपघातात मयत झालेल्या नातेवाईक यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याने राजेंद्र राख बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने लोकांनी त्याला रुग्णालयात हलविले मात्र त्यांच्यात आणखी दोघे जण समजले नाही. सकाळी पोलिसांनी शोध घेतल्या नंतर दोघांचा मृतदेह आढळून आला.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Motorcycle Degradation river two Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here