संगमनेरमध्ये दोन गावठी कट्टे बाळगणारे दोघांना अटक
संगमनेर | Sangamner: संगमनेर पोलिसांनी संगमनेर खुर्द परिसरात काल गावठी कट्टा व जिवंत काडतुसे तसेच ९७ हजाराचा मुद्धेमाल सहा दोन जणांना अटक केली आहे. या घटनेने संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पृथ्वीराज आबासाहेब देशमुख वय २२ आणि किरण विजय दळवी वय २४ दोघे रा. शिरसगाव ता. नेवासा यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अभय परमार यांना मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकाने सापळा रचत कारवाई करण्यात आली. जुन्या पुणे नाशिक महामार्गावर झोळे टोलनाक्याच्या दिशेने विना क्रमांकाची दुचाकी व दोघे येत असल्याचे पथकाला दिसले त्यांनी त्या दुचाकीस्वरांना थांबून झडती घेतली. त्यात दुचाकी चालकाच्या कंबरेला गावठी पिस्तुलात दोन जिवंत काडतुसे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघानाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Two arrested in Sangamner