नोकरी लावून देतो म्हणत गुंगीचे औषध देऊन दोघांनी केला तरुणीवर बलात्कार
श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय तरुणीला नोकरी लावून देतो असे म्हणत पुणे येथे बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या अत्याचाराचे मोबाईलमध्ये शुटींग काढून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पुण्यातील लॉजमध्ये आरोपीच्या इच्छेविरुद्ध बलात्कार करण्यात आला. तसेच शुटींग व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ६१ लाख ४४ हजार ६०० रुपयाची रक्कम घेऊन फसवणूक केली.
श्रीरामपूर परिसरातील प्रतिष्ठीत कुटुंबातील ३० वर्षीय तरुणीला आरोपी प्रसाद अनिल महामिने याने तरुणीच्या ओळखीचा फायदा घेत तिला ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे येथे नोकरीस लावून देतो असे म्हणत पुणे येथे बोलावून घेतले. तिच्या कॉफी मध्ये गुंगीचे औषध टाकून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या बालात्कारची मोबाईलमध्ये शुटींग काढण्यात आली. ती व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी प्रसाद महामिने याने वेळोवेळी पुणे येथे बोलावून लॉजवर तसेच आरोपी विशाल विठ्ठल ढोले व पूजा विशाल ढोले यांच्या घरात वारंवार बलात्कार करून तिला धमकावून आरोपी विशाल विठ्ठल ढोले याने स्वतःच्या घरात धमकावून पिडीत तरुणीवर बलात्कार केला तसेच शुटींग व्हायरल करण्याची धमकी देत पिडीत तरुणीची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी पिडीत तरुणीने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून प्रसाद अनिल महामिने, विशाल विठ्ठल ढोले व पूजा विशाल ढोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास डीवायएस पी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Shrirampur raped the girl by giving her a sedative