अकोले तालुक्यात करोना बाधितांची संख्या घटली, आज आढळले इतके रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ९ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या कमी झाली असली तरी अजून संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात गुरव झाप येथे २६ वर्षीय पुरुष, रेडे येथे २४ वर्षीय पुरुष, कळंब येथे ४९ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे २३ वर्षीय पुरुष, कळस खुर्द येथे ३५ आणि ६० वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे ४८ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ३० वर्षीय पुरुष, नाचणठाव ११ वर्षीय मुलगी आहे ९ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची बाधितांची संख्या २ हजार १४४ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka Today infected 9 person