Home अहमदनगर जो लायक नाही, त्यांना महत्व देण्याची मराठ्यांना गरज नाही: मनोज जरांगे

जो लायक नाही, त्यांना महत्व देण्याची मराठ्यांना गरज नाही: मनोज जरांगे

Maratha Reservation:  छगन भुजबळांचे नाव न घेता ज्या माणसाने घटनेच्या पदावर बसून राज्याचं पालकत्व स्वीकारल आहे, तोच माणुस कायदा पायदळी तुडवत जातीजातीमध्ये तणाव निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. जो लायक नाही, त्यांना महत्व देण्याची मराठ्यांना गरज नाही.

Marathas don't need to give importance to those who are not worthy Manoj Jarange

शेवगाव: अहमदनगर जिल्ह्यात सव्वा तीन लाख कुणबी नोंदी सापडल्या असून राज्यात एकुण मराठा समाजाच्या आजपर्यंत ३२ लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. याचा दिड ते दोन कोटी मराठा समाज बांधवांना लाभ मिळणार आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे ओबीसीमध्येच असून हेच आरक्षण ७० वर्षापूर्वी मिळाल असतं तर जगाच्या पाठीवर मराठा सगळ्यात श्रीमंत आणि प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिली असती. मराठा आरक्षणासाठी सुरु केलेला संघर्ष अंतिम टप्यात आहे. आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी एक इंचही मागे हटणार नसून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

गुरुवारी (दि.२३) झालेल्या मराठा आरक्षणाच्या विराट मेळाव्यात ते बोलत होते. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे ११ जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्ठी करत बोधेगाव नगरीत स्वागत करण्यात आले. जरांगे पुढे म्हणाले की, मराठ्यांनी इतरांना आरक्षण देताना विरोध केला नाही.

उलट अडचणींच्या काळात अन्याय झालेल्या जातीचं रक्षण करण्यासाठी धावून गेला. तसेच मराठ्यांनी कधीच जात शोधली नाही. कारण कधीकाळी हे आपल्या मदतीला धावून येतील, या भावनेतून सगळ्यांना साथ दिली. परंतु आज परिस्थिती वेगळी झाली आहे. मराठ्यांच्या बाजुने उभं न रहाता त्यांना सगळ्या बाजुने घेरलं जात असल्याचा आरोप सरकारवर केला आहे. छगन भुजबळांचे नाव न घेता ज्या माणसाने घटनेच्या पदावर बसून राज्याचं पालकत्व स्वीकारल आहे, तोच माणुस कायदा पायदळी तुडवत जातीजातीमध्ये तणाव निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. त्यामुळे जो लायक नाही, त्यांना महत्व देण्याची मराठ्यांना गरज नाही. राज्यात ५५ टक्के मराठा आहे, जमिनींचा बांध कोरला तर दोन पिढ्या आम्ही बोलत नाही आणि हे आग्यामोहळ मागे लागले तर काय होईल अशा रोखठोक शब्दांत भुजबळांचा समाचार घेतला. आरक्षण मिळावं असं ओबीसीच्या काही नेत्यांना वाटतय त्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे मतभेद, जाळपोळ, आत्महत्या न करता शांततेत आंदोलन करा. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु करा. कारण २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. मराठ्यांच्या पोरांसाठी गाफिल राहू नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Marathas don’t need to give importance to those who are not worthy Manoj Jarange

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here