Home अकोले सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन.कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन.कानवडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

Akole News:  सन १९९३-९४ पासून आदिवासी भागातील राजूर येथील अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून शैक्षणिक व सामाजिक कामास सुरुवात.

Satyaniketan Institute Secretary Adivasi Sevak Award announced to T N Kanwade

अकोले: सत्यनिकेतन संस्थेचे सचिव तथा अॅड.मनोहरराव देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य टी.एन.कानवडे यांना शासनाचा आदिवासी विकास विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर झाला आहे.

राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींना व सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत व्यक्ती व संस्था यांना अनुक्रमे आदिवासी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार राज्य सरकार दरवर्षी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करत असते. २०१९ ते २०२३ या वर्षांतील पुरस्कार हा कोरोना परिस्थिती व काही अपरिहार्य कारणांमुळे देण्यात आलेला नव्हता. या चार वर्षांतील एकत्रित पुरस्कार आदिवासी विकास विभागाने नुकतेच जाहीर केले आहेत.

टी.एन. कानवडे यांनी सन १९९३-९४ पासून आदिवासी भागातील राजूर येथील अॅड. मनोहरराव देशमुख महाविद्यालयात प्राचार्य म्हणून शैक्षणिक व सामाजिक कामास सुरुवात केली .या काळात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी व सामाजिक कामात वेगवेगळे उपक्रम राबविले.

२०१७ पासून ते अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेत सचिव म्हणून काम पाहत आहेत. तसेच अकोले तालुक्यातीलच सखाराम ठका गांगड यांना २०२०-२१ आणि फोफसंडी येथील दत्तात्रय हनुमंता मुठे यांना सन २०२२-२०२३ चा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Satyaniketan Institute Secretary Adivasi Sevak Award announced to T N Kanwade

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here