Home अहमदनगर नगर जिल्ह्यात धक्कादायक: महिला व मुलाचे मुंडकेच कापून नेले

नगर जिल्ह्यात धक्कादायक: महिला व मुलाचे मुंडकेच कापून नेले

Shevgaon heads of the woman and the child were cut off

शेवगाव | Shevgaon: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वर्षीय महिलेचा व १५ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहांचे मुंडकेच कापून कोणीतरी घेऊन गेले आहे. या घटनेने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत एका अज्ञात व्यक्तीने शेवगाव पोलिसांना या मृतदेहाची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सुजित ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटविणे जिकरीचे बनले आहे. याबाबत पोलिसांनी नगर येथील श्वान पथकाला पाचारण केले आहे. या मृतदेहाशेजारी गोणपाट, भांडी, पेटी. काडयाकुड्या असे अवास्तव पडलेले आढळून आले आहे. या धक्कादायक घटनेने तालुक्यात एकच चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Shevgaon heads of the woman and the child were cut off

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here