Home अहमदनगर खळबळजनक: विहिरीत आढळला तरुण व तरुणीचा मृतदेह

खळबळजनक: विहिरीत आढळला तरुण व तरुणीचा मृतदेह

Ahmednagar bodies of a young man and a young woman were found in the well

अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील दरेवाडी येथे एका विहिरीत तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह आढळला तर सायंकाळी चार वाजता तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

अजय सुरेश बडेकर वय २३ व मानसी भीमा पाचारे वय २२ असे या मृत तरुण व तरुणीचे नाव आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडली असावी असा संशय पोलिसांना आहे. विहिरीच्या काठावर तरुण व तरुणीच्या चपला आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह तरंगताना आढळून आला तर विहिरीत पोलिसांनी गळ टाकला असता दुपारी तरुणाचाही मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar bodies of a young man and a young woman were found in the well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here