Home संगमनेर Sangamner: संगमनेरातील माय लेकांचा भीषण अपघातात मृत्यू

Sangamner: संगमनेरातील माय लेकांचा भीषण अपघातात मृत्यू

Sangamnera dies in a tragic accident

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील साईनगर परिसरातील माय लेक नातेवाईक रुग्णाला भेटीसाठी जात असताना सिन्नरजवळ इनोव्हा कार व दुचाकी यांच्यात जोराची धडक बसल्याने अपघात होऊन मायलेकांनी आपला जीव गमविला आहे. शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अमोल पवार व शकुंतला पवार रा. साईनगर, संगमनेर असे या अपघातात मृत्यू झालेल्या माय लेकांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की,  घोटी येथील रुग्णालयात नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमोल व त्याची आई शनिवारी दुपारी घोटीकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. सिन्नर पासून काही अंतरावर घोटीकडे जात असताना त्यांच्या दुचाकी व इनोव्हा कार यांच्यात जोराची धडक बसली यामध्ये दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते मात्र दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. या घटनेने साईनगर येथे शोककळा पसरली आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर संगमनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sangamnera dies in a tragic accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here