Home अकोले झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा: शरद पवार यांची नाव न घेता माजी...

झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा: शरद पवार यांची नाव न घेता माजी मंत्री पिचड यांच्यावर टीका

Put aside Shukracharya in jari Sharad Pawar

अकोले | Akole: अगस्ती कारखान्याची निर्मिती अवघ्या ३५ कोटीत झाली होती अन आता त्या कारखान्यावर अडीचशे तीनशे कोटीचा बोजा चढविणारे झारीतील शुक्राचार्य यांना बाजूला करा.

कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी पाहिजे ती मदत करण्यास तयार आहोत असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी केले आहे. यावेळी माजी मंत्री पिचड यांचे नाव न घेता पवार यांनी टीका केली आहे.

Ashok Bhangare

लोकनेते आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते शेंडी भंडारादरा येथे रविवारी करण्यात आले यावेळी ते बोलत होते. पक्ष सोडून जाणारे आम्ही अनेक पाहिले आहेत मात्र आम्ही डगमगलो नाही. अकोलेतील जनतेने दाखवून दिले आहे. भांगरे कुटुंबीयाने सामंजस्य घेतल्यामुळे आज परिवर्तन घडले आहे. असे सामंजस्य टिकवून ठेवा. विकासासाठी बांधिलकी ठेऊन काम करत रहा. सर्वांनी एकत्रित रहा. तालुक्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करू असे ग्वाही पवार यांनी दिली आहे.

कोव्हीड आणि लॉकडाऊन यामुळे विकास कामांवर परिणाम झालेला आहे. तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी हिमालयासारखा आमदार किरण लहामटे व अशोक भांगरे यांच्या पाठीशी उभा राहील अशा शब्दात त्यांनी जनतेला एक विश्वास निर्माण करून दिला आहे.  

Web Title: Put aside Shukracharya in jari Sharad Pawar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here