Home संगमनेर संगमनेर शहरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत सलग तीन वर्ष अत्याचार

संगमनेर शहरातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत सलग तीन वर्ष अत्याचार

row luring a young woman from Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील एका तरुणाने संगमनेर शहरात राहत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

सदर प्रकार हा २०१७ ते २०२० दरम्यान होत होता. मात्र पिडीत तरुणीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अतुल शांताराम कदम रा. ओझर ता. संगमनेर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अतुल कदम या तरुणाची संगमनेर शहरातील साईश्रद्धा कॉलनीतील एका तरुणीशी ओळख झाली होती. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यांनतर कदम याने तिला लग्न करण्यासाठी मागणी घातली व तिला शिर्डी येथे नेले. तेथे देव दर्शनाच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आपण लवकरच लग्न करू असे सांगत त्याने २०१७ ते २०२० या दरम्यान तिच्याशी वारंवार शरीरसंबंध होत होते. मात्र अखेर पिडीत मुलीने लग्नाची मागणी केली असता कदम याने तिला मारहाण केली व घरातून बाहेर काढून दिले. यांनतर सदर मुलीने हा सर्व परकार पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून आरोपी कदम यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: row luring a young woman from Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here