Home अकोले आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अकोले: तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अबीटखिंड, सातेवाडी, भोजनेवाडी, जातेवाडी, बुळेवाडी(पैठण) येथील मुलांना दप्तर, वह्या वाटून मुला-मुलींना शैक्षणिक मदत केली. याकामी रामनाथ भोजने यांनी पुढाकार घेतला.

सदर प्रसंगी अकोले तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी पावशे, केंद्र प्रमुख रामनाथ साबळे, रामनाथ भोजने(अ. भा. वि. परिषद मुंबई अध्यक्ष), तसेच भोजनेवाडी मुख्याध्यापक वायळ सर, वळे सर, वाजेवाडी शाळेचे मुख्यध्यापक भागीत सरव दिघे सर, बुळेवाडी मुख्याध्यापक दिपक बोऱ्हाडे सर, मेंगाळ सर हे उपस्थित होते.

हा उपक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ. वैभवराव पिचड यांच्या प्रेरणेने सुरू असून अकोले तालुक्यातील पुढच्या टप्प्यात अनेक आदिवासी दुर्गम शाळांना वाटप होणार असून १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. राज्यातील आदिवासी भागातील १० पट संख्याच्या शाळा बंद केल्यास विकास परिषद मुलांसाठी आंदोलन करेल अशी माहिती मुंबई अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी दिली. वरील साहित्य वाटप करण्यासाठी कार्यकर्ते कर्मचारी,अधिकारी राजू जगधने, भिकाजी भोजन,प्रभाकर ठोंगिरे, भानुदास घनकुटे(इंडियन नेव्ही), सुनिल घनकुटे, डॉ. सखाराम घनकुटे, शीला नवाळे, सुनंदा भांगरे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी सरपंच भानुदास गोडे, लक्ष्मण भोजने, नामदेव भोजने, अजय भोजने, युवराज गोडे, शरद भोजने, सोमनाथ भोजने, शरद भवारी यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.

Website Title: On Behalf Of Tribal Development Council, Allotment Of School Literature To School Students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here