संगमनेरात गॅस कटरने एटीएम फोडून १४ लाख लंपास
Sangamner Crime: महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर फोडून १४ लाख १० हजार ३०० रुपये चोरट्यांनी चोरून (theft) नेले.
संगमनेर: शहरातून महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर फोडून १४ लाख १० हजार ३०० रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीनमधून पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत युगंधर धर्मराज कासार (सिनिअर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, ईपीएस कंपनी, मुंबई, रा. साईनगर घुलेवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil
मशीनचे नुकसान करीत चोरट्यांनी एटीएम मशीनमधून पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटा चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याबाबत अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.
Web Title: 14 lakh theft by breaking ATM with the gas cutter in Sangamaner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App