Home अकोला 16 वर्षीय मुलाने केली लहान भावाची हत्या; 11 दिवसांनी सापडला मृतदेह

16 वर्षीय मुलाने केली लहान भावाची हत्या; 11 दिवसांनी सापडला मृतदेह

Breaking Crime News: बेपत्ता असलेल्या सात वर्षीय चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा झाला. धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी दुसरा कुणी नसून 16 वर्षीय चुलत भाऊ.

16-year-old boy kills younger brother The body was found after 11 days

अकोला : अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील बेपत्ता असलेल्या सात वर्षीय शेख अफ्फान या चिमुकल्याच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.  खेळायला गेलेल्या अफ्फानचा शोध 12 दिवस सुरू होता. मृतदेह मिळाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 16 व्या दिवशी मारेकरीचा शोध लावलाय. धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी दुसरा कुणी नसून अफ्फानचा 16 वर्षीय चुलत भाऊ आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय अफ्फान या चिमुकल्याचा मृतदेह 11 दिवसांनंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पिंजर येथील शेख अफ्फान आयुब बागवान हा 19 डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. पिंजर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला होता. मात्र तरीही त्याचा शोध लागत नव्हता. 30 डिसेंबर रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पिंजरमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर श्वान पथकाच्या मदतीने एका विहिरीत शेख अफ्फानचा मृतदेह सापडला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 19 डिसेंबर रोजी मृत शेख अफ्फान आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघेही एका शेतातील विहिरीच्या बाजूला असलेल्या बंद खोलीतील कबुतर पकडण्यास गेले होते. खोली बंद असल्याने दोघेही खिडकीतून  आत शिरले. मृत शेख अफ्फान हा खिडकी जवळ पोते घेऊन थांबला होता. चुलत भावाने अफ्फनला खोलीच्या खिडकीजवळ पोते पकडून बसवले होते. त्यानंतर चुलत भावाने खोलीमधून कबुतर हाकलले. मात्र अफ्फानने जाणूनबुजून कबुतर सोडून दिले असा समज आरोपी भावाला झाला. रागाच्या भरात त्याने अफ्फानचा गळा आवळून त्याला विहिरीत धक्का दिला. त्यामुळे विहिरीत पडून अफ्फानचा मृत्यु झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपी चुलत भावाला ताब्यात घेतलं असून अधिक  तपास सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: 16-year-old boy kills younger brother The body was found after 11 days

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here