Home औरंगाबाद धक्कादायक! भाऊबीजेच्या दिवशीच १७ वर्षीय मुलीवर बलात्कार- Rape

धक्कादायक! भाऊबीजेच्या दिवशीच १७ वर्षीय मुलीवर बलात्कार- Rape

Aurangabad Crime News:  कन्नड तालुक्यात १७ वर्षीय मुकबधीर मुलीवर गावातीलच एकाने लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची घटना.

17-year-old girl was rape on the day of Bhaubiji

औरंगाबाद: राज्यात भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा होत असताना, औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुकबधीर मुलीवर गावातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार (sexually abusing) केल्याची संतापजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड  तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. मोरू रामू राठोड असे या नराधमाच आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. नेहमीप्रमाणे ते मोलमजूरीसाठी शेतात गेले होते. यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. याचीच संधी साधून आरोपी मोरू याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. याची वाच्यता कुणाजवळ केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. संध्याकाळी आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत आईने तिची विचारपूस केली असता, पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, आईने पोलिसांत धाव घेतली.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी मोरू रामू राठोड याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला जेरबंद (Arrested) केले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: 17-year-old girl was rape on the day of Bhaubiji

See Latest Marathi NewsAhmednagar News and Crime, Suicide, Political, Accident News Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here