Home औरंगाबाद भाजप पदाधिकाऱ्यास १८ लाखांचा गंडा

भाजप पदाधिकाऱ्यास १८ लाखांचा गंडा

Fraud Case: खरेदीसाठी ५० कोटी रुपये कर्ज देण्याच्या आमिषाने गुजरातच्या फायनान्सरने भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांची फसवणूक.

18 lakhs Fraud to BJP office bearer

औरंगाबाद शिक्षण संस्था : खरेदीसाठी ५० कोटी रुपये कर्ज देण्याच्या आमिषाने गुजरातच्या फायनान्सरने भाजपचे जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांची १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुजरातच्या तीन जणांवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

विकास शहा, दीपेश दिनेश चौधरी आणि नवनीत सिंग (सर्व रा. भावनगर, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत. भाजप जिल्हा सरचिटणीस तुषार शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना सातारा जिल्ह्यातील गौरी शंकर एज्युकेशन सोसायटी ही संस्था विकत घ्यायची होती. त्यासाठी ५० कोटी रुपये कर्जाची आवश्यकता होती. ठाण्यातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून नवनीतसिंग याची ओळख झाली. त्याने विकास शहा हा अहमदाबादेतील मोठा फायनान्सर आहे. तो ५० कोटी रुपये कर्ज देईल, असे सांगितले.

Web Title: 18 lakhs Fraud to BJP office bearer

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here