Home संगमनेर संगमनेर अकोलेतील 23 जणांना प्रवेश बंदी, विभागात दिसले तर अटक

संगमनेर अकोलेतील 23 जणांना प्रवेश बंदी, विभागात दिसले तर अटक

Breaking News | Sangamner: संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रवेश बंदी.

23 people from Sangamner Akole banned from entry, arrested if seen

संगमनेर: संगमनेर पोलीस उपविभागात 23 जणांना प्रवेश बंदी लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता व आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पाडावे कोणताही गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व अकोले पोलीस स्टेशन मधून एकूण 46 व्यक्तींना संगमनेर, अकोले तालुक्याच्या सीमा हद्दी मध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

 सदरचे प्रस्ताव सीआरपीसी 144 खाली सादर करण्यात आले होते. त्यापैकी एकूण 23 व्यक्तींवर आज आज रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी प्रवेश बंदीचे आदेश पारित केले आहेत. आदेशांची बजावणी आज रोजी पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. उर्वरित 23 प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे. दि 24/4/2024 पर्यंत सदर व्यक्तींना प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये या व्यक्ती संगमनेर तालुका किंवा अकोले तालुका हद्दी मध्ये मिळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

  1. संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (रा. अकोले रोड, संगमनेर)
  2. इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर)
  3. हुजेब शब्बीर शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर),
  4. अरबाज करीम शेख (रा. रहेमतनगर, संगमनेर),
  5. नईम कादर शेख (रा. उन्मतनगर, संगमनेर),
  6. शुभम हिरामण शिंदे (रा. शिवाजीनगर संगमनेर),
  7. कासिम असद कुरेशी (रा. भारत नगर संगमनेर),
  8. धीरज राजेंद्र पावडे (रा. इंदिरानगर संगमनेर),
  9. इम्रान उस्मान पठाण (रा. अकोले नाका संगमनेर),
  10. सुहास भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी अकोले),
  11. विशाल लक्ष्मण डगळे (रा. खिरविरे, अकोले),
  12. लक्ष्मण ज्ञानदेव डगळे (रा. खिरविरे, अकोले),
  13. अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे रा. कळस खुर्द अकोले),
  14. दौलत साहेबराव महाले (रा. बेलापूर अकोले),
  15. खंडू दादाभाऊ करवर (रा. ढोकरी अकोले),
  16. मनोज शिवाजी काकड (रा. जोर्वे संगमनेर),
  17. मयूर राघू दिघे (रा. जोर्वे संगमनेर),
  18. प्रसाद दिलीप काकड (रा. जोर्वे संगमनेर),
  19. कृष्णा विलास इंगळे (रा. जोर्वे संगमनेर),
  20. दत्तात्रेय संपत थोरात (रा. वडगाव पान संगमनेर),
  21. सत्यम भाऊसाहेब थोरात (रा. वडगाव पान संगमनेर),
  22. अब्दुल गफार पठाण (रा. बोटा, संगमनेर),
  23. मोईन हनीफ कुरेशी (रा. माळवदवाडी संगमनेर)

Web Title: 23 people from Sangamner Akole banned from entry, arrested if seen

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here