Home नागपूर २७ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, २ वर्ष सुरु होता धक्कादायक...

२७ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, २ वर्ष सुरु होता धक्कादायक प्रकार  

27-year-old sexually abuses a minor girl

नागपूर | Nagpur Crime: नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २७ वर्षीय तरुणानं १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexually abuses) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. दरम्यान १० मे रोजी आरोपीनं पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवले. यानंतर पीडित मुलीनं संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमितेश आशिष श्रीवास (२७, गिट्टीखदान) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित मुलगी १० वी च्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती आठवीत असतानाच आरोपी अमितेश यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. आपण लग्न करू, सुखाचा संसार असेल, मुंबईत घर घेऊ  अशी पूर्ण न होणारी स्वप्न व आमिष आरोपीनं तिला दाखवली होती. यामुळे ती आरोपीच्या जाळ्यात अडकली होती.

१८ मे २०२० मध्ये आरोपीनं तिला आपल्या घरी बोलावलं होतं. तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. पण दहावीचं वर्ष असल्यामुळे अभ्यास करण्यासाठी मुलीने अमितेशकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तो चिडून तिला बदनामीची धमकी देत होता.

दरम्यान, १० मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी अमितेश पीडित मुलीच्या घरी आला होता. यावेळी त्यानं पीडितेशी बळजबरीने शारीरिक संबंध (Sexual  harassment) प्रस्थापित केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पिडीत मुलीने घाबरून या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. घटनेची माहिती मिळताच आईसह मुलीने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असूनआरोपीला अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: 27-year-old sexually abuses a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here