Home नागपूर मेकअपचं काम येतं म्हणून फेशियल करण्यासाठी बोलवलं घरी, ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार

मेकअपचं काम येतं म्हणून फेशियल करण्यासाठी बोलवलं घरी, ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार

Breaking News | Nagpur Crime: हद्दीत फेशियल करण्यासाठी बोलावून मालकाने ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना.

31-year-old woman was assaulted when she was called for a facial as her makeup

नागपूर: प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेशियल करण्यासाठी बोलावून मालकाने ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.  त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पीयूष ढावले (वय ३३, मूळ रा.सुठाणा, जि.चंद्रपूर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पीडित महिला पीयूषच्या प्रतिष्ठानात काम करते. तिला मेकअपचे काम येते. एप्रिल २०२२मध्ये त्याने महिलेने फेशियल करण्यासाठी घरी बोलाविले. तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. काही दिवसांपूर्वी त्याने लग्नास नकार दिला. महिलेच्या फिर्यादीवरून  त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 31-year-old woman was assaulted when she was called for a facial as her makeup

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here