Home गडचिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, संतापजनक घटना

प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, संतापजनक घटना

Breaking News | Crime: घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार (abused) केल्याचा प्रकार समोर.

5-year-old girl abused by soldier in primary health centre

गडचिरोली: येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत असून त्याने स्वतःच्या शासकीय निवासस्थानात चिमुरडीवर अत्याचार केले. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात शनिवारी (९ मार्च) रोजी ही संतापजनक घटना समोर आली.

संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. अत्याचारानंतर मुलीची प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेवर उपचार करण्यात हेळसांड करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ही घटना ९ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. पीडित मुलीच्या घराशेजारीच आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे. या वसाहतीत आरोपी संतोष कोंडेकर हा तिथे एकटाच राहतो. घरासमोर खेळत असलेल्या मुलीला त्याने खाऊचे आमिष दाखवून मुलीला घरात बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. मुलीने घरी येऊन घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले, पण तेथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरूवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरु आहे.

Web Title: 5-year-old girl abused by soldier in primary health centre

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here