Home महाराष्ट्र Rape | चहा आणि बिस्किटाचे आमिष  देऊन ७० वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर...

Rape | चहा आणि बिस्किटाचे आमिष  देऊन ७० वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

70-year-old man rape a minor girl by offering her tea and biscuits

Rape Case | मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय वृध्दाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केला आहे. नराधम आरोपीने मुलीला चहा आणि बिस्किटाचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भायखळ्यात राहणार्‍या एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने एका लहान मुलीला चहा आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. नंतर या मुलीला एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार (Sexual abuse) केला. तसेच याबाबत कुठे काहीही न सांगण्याची धमकी देखील दिली.

तर मुलीने आपल्या आईला झालेला सर्व प्रकार कथन केला. त्यानुसार  पीडित मुलीच्या आईन पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार केली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: 70-year-old man rape a minor girl by offering her tea and biscuits

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here