Home महाराष्ट्र नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला अत्याचार

नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला अत्याचार

Breaking News | Crime:  चार वर्षीय चिमुकलीवर सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना.

A 4-year-old child studying in a nursery was assaulted by a security guard

मुंबई: चार वर्षीय चिमुकलीवर सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  पीडित मुलगी शिकत असलेल्या नर्सरीच्या सुरक्षा रक्षकानेच हे दुष्कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने स्वच्छतागृहात नेऊन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. कांदिवली परिसरातील ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुलगी शुक्रवारी नर्सरीमध्ये गेली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षक तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

घरी गेल्यानंतर मुलीला त्रास व्हायला लागला. आईने तिला जवळील हॉस्पिटलमध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती पालकांना दिली. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

त्यानंतर पालकांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाला अटक केली. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: A 4-year-old child studying in a nursery was assaulted by a security guard

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here