Mumbai | मुंबई: मुंबईतील विक्रोळी पूर्व येथील टागोरनगरमध्ये एका ५१ वर्षीय नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडाछाड करीत लैंगिक अत्याचार (Sexually assault) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नराधम आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
मिलींद दादू आगावणे असे नराधम आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर येथे ही पीडित मुलगी राहते, याच परिसरात आरोपी मिलींद दादू आगावणे हा आरोपी राहतो. मुलगी ७ जून रोजी क्लाससाठी जात असताना या आरोपीने छेडछाड करत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मुलीने घरच्यांना सांगितली. मुलीच्या पालकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी विरोधात लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २१२ कलम ८,१२ प्रमाणे ३३०/२२,३५४,३५४ अ, या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: A 54-year-old man sexually assault a 14-year-old girl