Home क्राईम बीअरबारमध्ये घेतली लाच;  दोन कर्मचारी जाळ्यात, एसीबीची कारवाई

बीअरबारमध्ये घेतली लाच;  दोन कर्मचारी जाळ्यात, एसीबीची कारवाई

Beed Crime: सांगून जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली, तडजोडीअंती १३ हजार रूपये घेताच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या.

A bribe taken in a beer bar Two employees arrested 

बीड : जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविल्याबाबतचे सांगून जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १३ हजार रूपये घेताच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरातील एका बीअरबारमध्ये केली.

रामा बन्सीधर लोखंडे (३८, कनिष्ठ लिपिक) व ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ (३०, कनिष्ठ सहायक) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही माजलगावमधील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. दोन दिवसांपूर्वी तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे धाव घेतली. पोलिस

निरीक्षक अमोल धस यांनी या प्रकरणात लक्ष घालत बुधवारी दुपारी सापळा लावला. सरकारी पंचासमक्ष त्यांच्याच कार्यालयात पडताळणी केली. नंतर या दोघांनीही तक्रारदाराला बीड रोडवरील एका बीअरबारमध्ये बोलावले. तेथे १३ हजार रुपयांची लाच घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले.

Web Title: A bribe taken in a beer bar Two employees arrested 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here