Home नाशिक खळबळजनक! मृत पुरुष जातीचे अर्भक थेट शौचालयात

खळबळजनक! मृत पुरुष जातीचे अर्भक थेट शौचालयात

Breaking News | Nashik Crime: सार्वजनिक सुलभ शौचालयामध्ये एका पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले.

A dead male infant directly into the toilet

नाशिक : पाथर्डी गावातील सार्वजनिक सुलभ शौचालयामध्ये एका पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. मृत नवजात अर्भक हे आठ ते दहा दिवसांपूर्वी याठिकाणी टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  महापालिकेचे कर्मचारी महेंद्र दिलीप गांगुर्डे (रा. समतानगर, गांधीनगर) हे सोमवारी (ता. ४) सकाळी पाथर्डी गावात असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयात गेले असता, त्यावेळी त्यांना मृतावस्थेतील नवजात अर्भक आढळून आले. त्यांनी याची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविली.

या घटनेची माहिती मिळताच, उपनिरीक्षक उघडे, हवालदार सुनील गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अर्भक हे पुरुष जातीचे असून, सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी ते या ठिकाणी टाकण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. सदरचा मृतदेह आठवडापूर्वीचा असल्याने कुजलेल्या स्थितीमध्ये होता.

जागेवर पंचनामा करून पोलिसांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली. अनैतिक संबंधातून सदरील अर्भक जन्मले असावे अथवा घरगुती बाळंतपण करताना मृत अर्भक जन्माला आले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. पुढील तपास हवालदार सुनील गांगुर्डे हे करीत आहेत.

Web Title: A dead male infant directly into the toilet

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here