Home अहमदनगर अहमदनगर: चिंचेच्या झाडाला गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर: चिंचेच्या झाडाला गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagar News:  चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना.

A farmer committed suicide by hanging himself from a tamarind tree

अहमदनगर: स्वतः च्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील हातवळण गावात घडली आहे. दिलीप हरीभाऊ वाघ (वय ५७, रा. हातवळण ता. नगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (दि.३) सकाळी ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप हरीभाऊ वाघ यांनी त्यांच्या हातवळण शिवारातील शेतात चिंचेच्या झाडाला

दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस येताच त्यांना नातेवाईक निवृत्ती वाघ यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलीप वाघ यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: A farmer committed suicide by hanging himself from a tamarind tree

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here