Home संगमनेर संगमनेरमध्ये चक्क गाईचं अनोखं डोहाळे जेवण सोहळा, पूजन, कीर्तन, महाप्रसाद

संगमनेरमध्ये चक्क गाईचं अनोखं डोहाळे जेवण सोहळा, पूजन, कीर्तन, महाप्रसाद

Ceremony of a cow in Sangamner: गोमातेचा डोहाळे जेवण सोहळा साजरा, गोमातेचे पूजन, कीर्तन, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन.

a unique ceremony of a cow in Sangamner

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात आंबी खालसा गावात जोठेवाडी येथील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण गाडेकर या शेतकऱ्याने हिंदू धर्माची शान असणाऱ्या गोमातेचा डोहाळे जेवण सोहळा साजरा केला. हिंदू रितीरिवाजाप्रमाणे आपल्या जीवनात आईचे आणि गाईचे महत्त्व अधिक आहे. एक अनोखा सोहळा साजरा करण्यात आला आहे.

गोमातेचे पूजन करून आपल्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा गावातील जोठेवाडी येथील शेतकरी गाडेकर कुटुंबांनी केला आहे. गाईचे स्थान शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे. हे गाडेकर कुटुंबियांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना गायी पासून अनेक फायदे मिळतात तरी गायीची काहीजण अवहेलना करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे व गायींचा सांभाळ प्रत्येक कुटुंबाने आपल्या आईप्रमाणे केला पाहिजे हेच या सोहळयातून दिसून येत आहे.

गाई ही शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा हिस्सा असते. गाईपासून मिळणारे दुध आणि शेणापासून त्या कुटुंबाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यरित्या उदरनिर्वाह सुरु असतो. घरातील एका कर्त्या पुरुषासारखी घराला ही मुकी जनावरे हातभार लावत असतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात एकतरी गाय ठेवली पाहिजे, असे मनोगत ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी गोमातेचे पूजन, कीर्तन, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक शेतकरी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: a unique ceremony of a cow in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here