Home अकोले अकोले: घाटात महिलेचा मृतदेह आढळला

अकोले: घाटात महिलेचा मृतदेह आढळला

Breaking News | Akole: समशेरपूर घाटात एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला.

A woman's body was found in the ghat

अकोले : तालुक्यातील मुथाळणे- समशेरपूर घाटात एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून बबाबाई पंढरी फोडसे असे मृत महिलेचे नाव आहे. हा घातपात आहे की, बिबट्याचा हल्ला याचा शोध पोलीस घेत आहेत.

सोमवारपासून बेपत्ता असलेल्या बबाबाई फोडसे यांचा मृतदेह काल गुरुवारी सकाळी मुथाळणे- समशेरपूर घाटात निंब्याची नळी येथे महिलेचा मुलगा नवनाथ याला आढळून आला. फोडसे कुटुंबीय गेल्या सोमवारपासून बबाबाई यांचा शोध घेत होते. मुथाळणेच्या फोडसे वाडी येथील असणाऱ्या बबाबई यांना तीन मुले व एक मुलगी असून या सर्वांची लग्ने झालेली आहेत. त्यांचा मृतदेह हा अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला त्यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झालेले आहे. त्यांच्यावर बिबट्‌याने हल्ला करून त्यांना मारल्याचा संशय आहे. पुढील अकोले पोलीस करीत आहेत.

Web Title: A woman’s body was found in the ghat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here