Home अमरावती Murder: पत्नीला पळवून नेणाऱ्या, पत्नीच्या प्रियकराची निघृण हत्या

Murder: पत्नीला पळवून नेणाऱ्या, पत्नीच्या प्रियकराची निघृण हत्या

Lover Murder Case:  एक वर्षापासून महिला पतीचे घर सोडून प्रियकर बरोबर राहत होती, जबर मारहाण, त्यानंतर त्याला दगडाने ठेचले यातच त्याचा मृत्यू.

Abductor of wife, the brutal murder of wife's lover

अमरावती:  प्रेमसंबंधातून काही व्यक्ती एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकरच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.अमरावतीमध्ये देखील अशीच एक हत्येची घटना घडली आहे. यात एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची निघृण हत्या केली आहे. सदर घटनेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील राजना येथे ही घटना घडली आहे. अमित उपाध्ये असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमित आणि एका विवाहित महिलेचे गेल्या एक वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते. महिलेला दोन मुलं असूनही ती अमितच्या प्रेमात पडली होती. ही गोष्ट जेव्हा घरामध्ये समजली तेव्हा महिलेच्या पतीने तिला मारहाण केली. तसेच मुलांना देखील आईच्या वागण्याचा राग आला होता.

त्यामुळे गेल्या एक वर्षापासून महिला आपल्या पतीचे घर सोडून प्रियकर अमितबरोबर राहत होती. ते दोघे एकत्र लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. महिलेच्या अशा वागण्याने परिसरात आणि कुटुंबीयांमध्ये महिलेच्या पतीला फार अपमानकारक आयुष्य जगावे लागत होते. त्यामुळे त्याच्या मनात अमित विषयी फार राग होता. हाच राग त्याने मुलांच्या संमतीने व्यक्त केला.

अमितला जन्माची आद्दल घडवायची असे त्याने ठरवले. आपल्या मुलांच्या मदतीने आोरोपीने अमितला जबर मारहाण केली. सुरुवातीला त्यांनी अमितला काठीने खूप मारले. त्यानंतर त्याला दगडाने ठेचले यातच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर या सर्वांनी तेथूळ पळ काढला. मात्र पोलिसांना याची खबर मिळताच त्यांच्या एका पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि त्यांना ताब्यात घेतले. पोलिस अमितच्या हत्येमागे आणखीन दुसरे कारण आहे का याबाबत अधिक तपास करत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Abductor of wife, the brutal murder of wife’s lover

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here