Home अहमदनगर अत्याचार प्रकरण: मुल्ला कटर टोळीवर मोक्काची कारवाई

अत्याचार प्रकरण: मुल्ला कटर टोळीवर मोक्काची कारवाई

Ahmednagar | Shrirampur: अत्याचार (abuse) गंभीर स्वरूपाचे गुन्हे : आरोपींमध्ये सहा जणांचा समावेश.

abuse case Mokka's crackdown on Mullah Kattar gang

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यात चर्चेला आलेल्या अल्पवयीन मुलीचे धर्मांतर व बळजबरीने विवाहाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान युसूफ कुरेशी उर्फ मुल्ला कटरसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यात सहा आरोपींचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी मोक्काच्या कारवाईला मंजुरी दिली.

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या आदेशावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना प्रकरणाचा सखोल तपास केला. त्यानंतर कटर टोळीविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. आरोपींमध्ये इम्रान युसूफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय ३५), प्रशांत उर्फ पप्पू दादासाहेब गोरे (वय ३१), सचिन मधुकर पगारे, सुमन मधुकर पगारे (वय २८, रा. सर्व श्रीरामपूर), बाबासाहेब उर्फ बाबा एकनाथ चेंडवाल (वय ५२, रा. गुंजाळे, राहुरी), मीनाबाई रूपचंद मुसवत (वय ४५, शिवाजीनगर, शेवगाव) यांचा समावेश आहे.

अपहरण, धर्मांतर, सामूहिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे या आरोपींवर दाखल आहेत. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये कटरसह त्याच्या साथीदारांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

राणेंनी काढला होता मोर्चा

राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुल्ला कटर याने केलेल्या अत्याचाराचे प्रकरण चर्चिले गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटर याच्याविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन सभागृहाला दिले होते. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरात जनआक्रोश मोर्चाही याप्रकरणी काढण्यात आला होता. त्यामुळे मुल्ला कटर टोळीविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत मिळाले होते.

Web Title: abuse case Mokka’s crackdown on Mullah Kattar gang

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here