Home अहमदनगर भाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

भाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

Ahmednagar: भाड्याची खोली घेऊन पाच महिने राहिला. तिच्यावर अत्याचार (abuse) केला.

Abuse of a girl by taking a rented room

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत गणेश शहाजी परकाळे (३०, रा. पिंप्री घुमरी) याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

१३ मार्च २०१९ रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने घरातून पळून नेलेबाबतची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल होती. ही मुलगी ५ सप्टेंबर २०१९ रोजी भिंगार कॅम्प पोलिसांना आरोपी गणेश शहाजी परकाळे याचे सोबत गोल्हेगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे मिळून आली. या मुलीसोबत आरोपीची ओळख झाली होती.

त्याचे लग्न झालेले असताना पीडित मुलीला धमकी देऊन पळवून नेले. बेलवंडी फाटा येथे भाड्याची खोली घेऊन पाच महिने राहिला. तिच्यावर अत्याचार केला. ओझर येथील एका मंदिरामध्ये माळ घालून लग्न झाले असल्याचे सांगितले. पीडितेचा शोध लागल्यानंतर ती सोळा आठवड्यांची सहकार्य केले.

गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलगी, पंच तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मनपा अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, रासायनिक विश्लेषक तज्ज्ञ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले. त्यांना गोडे, राठोड वडते, दांगोडे यांनी केले.

Web Title: Abuse of a girl by taking a rented room

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here