Home अहमदनगर अहमदनगर: सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

अहमदनगर: सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

Ahmednagar Crime News:  आई-वडिल घरी नसल्याचा फायदा घेत सहा वर्षांच्या बालिकेला खोलीमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.

Abuse of a six-year-old girl

अहमदनगर: आई-वडिल घरी नसल्याचा फायदा घेत सहा वर्षांच्या बालिकेला खोलीमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 4) दुपारी नगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश राधाकिसन राठोड (रा. नगर) याच्या विरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळच्या माळसिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील फिर्यादी व त्यांचे पती दोन मुलींसह गेल्या 10 वर्षांपासून नगर शहरात राहतात. ते दोघे मोलमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दिवसभर दोघे कामानिमित्त घराबाहेर असल्याने त्यांच्या दोन्ही मुली घरी असतात. फिर्यादी बुधवारी दुपारी दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान कामावरून घरी आल्या असता त्यांना दोन्ही मुली घरात दिसल्या नाही. त्याच दरम्यान त्यांच्या लहान सहा वर्षाच्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला असता त्या शेजारी असणार्‍या खोलीकडे गेल्या असता तेथे दिनेश राठोड व फिर्यादीची मुलगी मिळून आली. फिर्यादीने आरडाओरडा केला असता राठोड तेथून पळून गेला. फिर्यादीने त्यांच्या मुलीची राठोडच्या ताब्यातून सुटका केली. घरामध्ये कोणीही नसताना एकटेपणाचा फायदा घेऊन राठोड याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगून फिर्याद दिली. पोलिसांनी राठोड विरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक केली आहे. सहा.पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Abuse of a six-year-old girl

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here