Home क्राईम धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

Breaking News | Pune Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार (Abuse) करून तरुण पसार झाल्याची घटना.

Abuse of mentally retarded girl, crime against youth

पुणे : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अत्याचार केल्यानंतर मुलीला धमकावून पसार झालेल्या आरोपी तरुणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अविनाश पवार (रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मतिमंद मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची दहा वर्षांची मुलगी मतिमंद आहे. आरोपी पवारने मतिमंद मुलीला धमकावून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकाराची कोणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच मुलीला मारहाण करुन तो पसार झाला. घाबरलेल्या मुलीने आईला याबाबतची माहिती दिली. बालकांचे लैंंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोस्को), तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय अधिक तपास करत आहेत.

Web Title: Abuse of mentally retarded girl, crime against youth

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here