Home अहमदनगर अहमदनगर: विवाहितेचा विश्वास संपादन करून अत्याचार

अहमदनगर: विवाहितेचा विश्वास संपादन करून अत्याचार

Ahmednagar News:  विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.

abused by gaining the trust of the spouse

अहमदनगर: विवाहितेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच दुचाकी खरेदीसाठी तिच्या नावावर 40 हजारांचे कर्ज काढून ते परत न करता विश्वासघात केला आहे. याप्रकरणी नगर शहरातील पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अजय नरेंद्र पैठणकर (रा. असलगाव, जि. बुलढाणा) याच्या विरोधात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला तिचा पती 2018 पासून सोडून गेला आहे. फिर्यादीची मैत्रिणी मार्फत पैठणकर सोबत सन 2021 मध्ये ओळख झाली होती. दोघांमध्ये फोनवर बोलणे होत होते. त्यांचा एकमेकांवर विश्वास बसल्याने पैठणकर बुलढाणा सोडून नगरमध्ये राहण्यास आला. त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले.

तसेच जानेवारी 2023 मध्ये त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून दुचाकी खरेदी करण्यासाठी फिर्यादीच्या नावे बँकेचे 40 हजार रुपये कर्ज काढले. त्यातून दुचाकी खरेदी केली. दरम्यान, त्याने लग्न न करता दुचाकी घेऊन निघून गेला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्याने पीडितेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे करीत आहेत.

Web Title: abused by gaining the trust of the spouse

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here