Home अहमदनगर अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार

अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार

Ahmednagar Crime:  ‘तुला बायको सारखी वागवतो, लग्न करतो असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार (abused) केल्याची घटना.

abused by the lure of marriage

अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरूणीने या प्रकरणी मंगळवार, 10 जानेवारी 2023 रोजी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश काशिनाथ प्रधान (रा. रांजणगाव पोळा, ता. जि. औरंगाबाद, हल्ली रा. दुधडेअरी चौक, बायपास रोड ता. नगर) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरूणी मुळची शिरूर कासार (जि. बीड) येथील रहिवाशी असून त्या सध्या नगरमध्ये राहतात. त्यांच्यावर सुरेश प्रधान याने 14 फेब्रुवारी, 2017 ते सन 2022 पर्यंत नगर शहरातील सावेडी, बोल्हेगाव व तो राहत असलेल्या ठिकाणी दुध डेअरी चौक येथे वेळोवेळी अत्याचार केला आहे. ‘तुला बायको सारखी वागवतो, लग्न करतो असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्या असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच 10 जानेवारी, 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता पीडित फिर्यादी सुरेश प्रधान याच्या प्रेमदान हाडको, सावेडी येथील कार्यालयात गेल्या असता त्यांनी तेथे नेवासा येथील एका महिलेसोबत सुरेश प्रधान याचे संबंध असल्याचे पाहिले. दरम्यान यावरून पीडितेला सुरेश प्रधान व त्या महिलेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

Web Title: abused by the lure of marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here